मुंबई : एअर इंडियाचं बंद पडलेलं 'सीटा' सर्व्हर तब्बल पाच तासांच्या अडथळ्यानंतर पूर्ववत करण्यात यश आलंय. सर्व्हर सुरू झाल्याची माहिती एअर इंडियाच्या संचालक आश्विनी लोहाणी यांनी दिली आहे. सीटा सर्व्हर बंद पडल्यामुळे देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली होती. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसलाय. सर्व्हर दुरुस्त झालं असलं तरी भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांना अडचणीला सामोरं जावं लागतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



२७ एप्रिलच्या मध्यरात्री जवळपास ३.३० वाजल्याच्या सुमारास एअर इंडियाचे 'सीटा सर्व्हर' तांत्रिक कारणामुळे ठप्प झाले होते. यामुळे देशातील विविध शहारात जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या त्रासामुळे मुंबई तसेच दिल्लीच्या विमानतळावर हजारो प्रवाशांची गैरसोय झालेली पाहायला मिळाली.


सीटा सर्व्हरवर ठप्प झाल्यानंतर अनेक देशांतर्गत असलेले उड्डाण रखडून होते. ही समस्या दूर करण्यासाठी आमचे इंजिनिअर काम करत असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवकत्यांनी दिली होती. इंजिनियर काही तासांपासून सीटा सर्व्हर पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. तब्बल पाच तासानंतर हे सर्व्हर पूर्वरत झाले. तसेच सीटा सर्व्हर ठप्प झाल्याने जो त्रास प्रवाशांना सहन करावा लागला त्याबद्दल 'एअर इंडिया'नं खेद व्यक्त केलाय.