चंडीगढ : ११ वर्षाच्या मुलीने विमानात उलटी केल्याने तिच्यासह कुटुंबाला बाहेर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पंजाब राज्यातर्फे या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने ३५ लाखची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले गेले आहे.गेल्यावर्षी दिल्ली विमानतळावरून टोरंटो जाणाऱ्या विमानातून तीन प्रवाशांना उतरवलं गेलं. यामध्ये मिनाली मित्तल आणि तिची ११ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. सप्टेंबर २०१७ मध्ये त्या चंढीगड मोहालीतून जेट एअरवेजच्या विमानातून दिल्लीतील कॅनडा जाऊ इच्छित होती.


शौचालयातून दुर्गंधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर कॅनडाच्या विमानात चढल्यानंतर माझी मुलगी मित्तलला शौचालयात जायचे होते पण ते बंद होते. ती वाट पाहत राहिली. शौचालयातून दुर्गंधी येत होती. यानंतर अस्वस्थ होऊन तिने उलटी केल्याचे मिनालीने आपल्या याचिकेत म्हटलंय. 


आयोगाचे अध्यश्र न्यायाधीश परमजीत सिंह धालीवाल आणि दुसरे सदस्य किरण सिब्बल यांनी २३ जुलैला एअरलाईन्सला भरपाई देण्याचे निर्देश दिले. जेट एअरवेज आणि एअर कॅनडा यांनाही भरपाई देण्यास सांगितलं गेलंय.