एअरपोर्ट सारखी आहे ही स्मशानभूमी, सुविधा बघून विश्वास बसणार नाही
गुजरातच्या बारडोलीमध्ये एक अशी स्मशानभूमी आहे जी एका एअरपोर्टच्या थीमवर बनवण्यात आली आहे. स्मशानभूमीला एअरपोर्ट प्रमाणे डिसाईन करण्यात आलं आहे. सोबतच त्याचं नाव अंतिम उड्डाण मोक्ष यात्रा ठेवण्यात आलं आहे.
अहमदाबाद : गुजरातच्या बारडोलीमध्ये एक अशी स्मशानभूमी आहे जी एका एअरपोर्टच्या थीमवर बनवण्यात आली आहे. स्मशानभूमीला एअरपोर्ट प्रमाणे डिसाईन करण्यात आलं आहे. सोबतच त्याचं नाव अंतिम उड्डाण मोक्ष यात्रा ठेवण्यात आलं आहे.
या स्मशानभूमीमध्ये दोन मोठ्या विमानांची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली आहे. ज्याची नाव मोक्ष एअरलाइंस आणि स्वर्ग एअरलाइंस आहे. या स्मशानभूमीमध्ये ५ चितास्थळ आहेत. त्यापैकी 3 हे इलेक्ट्रिक मशीनमध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी आहे. मृतदेहाला अग्नी देताच विमानाच्या उड्डाणाचा आवाज येतो.
या स्मशानभूमीमध्ये जेव्हा कोणी पोहोचतं तेव्हा त्याचं एअरपोर्टवर जशी अनाऊंसमेंट होते तशी त्याच्या नावाची अनाउंसमेंट होते. अनाउंसमेंट करुन सांगितलं जातं की, कोणत्या गेटमधून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. येथे नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देखील विशेष सोय केली आहे.