Ajab Gajab : पतीच्या आयुष्यात दुसऱ्या महिलेचा प्रवेश कोणतीही पत्नी सहन करु शकणार नाही. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो, पाहात असतो. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, पत्नीनेच पतीचं दुसरं लग्न (Married) लावून दिलं आहे. प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे पहिल्या पत्नीने पतीचं दुसरं लग्न लावून दिलं. आणि त्याहून हैराण करणारी गोष्ट म्हणजे दोन पत्नीने मिळून पतीचं पुन्हा तिसरं लग्नही करुन दिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीनही पत्नी एकाच घरात गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
हैराण करणारी ही घटना आंध्रप्रदेशमधल्या (Andhra Pradesh) विशाखापट्टनम इथली आहे. इथल्या अल्लूरी सीताराम जिल्ह्यात एका महिलेने आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं. त्यानंतर दोनही पत्नीने पतीला तिसरं लग्न करण्यास मदत केली. अल्लुरी जिल्ह्यातील गुलेलू गावात राहाणाऱ्या सगेनी पांडन्ना या व्यक्तीने 2000 मध्ये पर्वतम्मा नावाच्या महिलेशी लग्न केलं. लग्नाच्या सात वर्षांनी पर्वतम्माने पती सगेनीचं दुसरं लग्न लावून दिलं. मुल होत नसल्याने पर्वतम्माने हा निर्णय घेतला. त्यानंतर पर्वतम्माच्या मंजूरीने सगेनी पांडन्नाने 2007 मध्ये अप्पलम्मा या महिलेशी लग्न केलं. 


दुसऱ्या पत्नीपासून सगेनीला एक मूल झालं. पण त्यांना आणखी मुलं हवी होती. त्यामुळे पर्वतम्मा आणि अप्पलम्मा यांनी पतीचं तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सगेनी पांडन्नाने पर्वतम्मा आणि अप्पलमा यांना आपल्याला एक मुलगी पसंत असल्याचं सांगितलं. किल्लमकोटा गावातील लव्या उर्फ लक्ष्मी असं मुलीचं नाव आहे. पतीच्या पसंतीला पहिल्या दोन पत्नींनी अजिबात विरोध केला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पर्वतम्मा आणि अप्पलम्मा या दोघी स्वत: बोलणी करण्यासाठी लक्ष्मीच्या घरी गेल्या.


तिसऱ्या लग्नासाठी कुटुंब तयार
पर्वतम्मा आणि अप्पलम्मा यांनी लक्ष्मीच्या कुटुंबियांकडे पतीसाठी लक्ष्मीचा हात मागितला. तिच्या कुटुंबियांनीही कोणतेही आढेवेढे न घेता लग्नाला परवानगी दिली. सगेना पांडन्नाची आधी दोन लग्न झालेली माहित असतानाही तिच्या कुटुंबियांनी लक्ष्मीचं सगेनाबरोबर लग्न लावून दिलं. सगेनाच्या दोन्ही पत्नीने तिसऱ्या लग्नाची पत्रिकाही छापली आहे. इतकंच नाही तर लग्नाचं निमंत्रण देणारे फ्लेक्सही गावात लावले. मोठ्या धामधुमती सगेनाचं तिसरं लग्न पार पडलं. 25 जूनला हे लग्न पार पडलं.


तिसऱ्या लग्नं आंध्रप्रदेशमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. गावाती काही लोकांनी सगेनाच्या तीन लग्नाला विरोध केला आहे. अशा गोष्टीमुळे वाईट प्रथा सुरु होईल अशी भीती ग्रामस्थांनी सुरु केली आहे. गावकऱ्यांच्या विरोधानंतर सेगना आणि त्याच्या तीन पत्नींनी गाव सोडलं आणि दुसऱ्या गावात स्थायिक झालेत.