मुंबई : सिग्नेचर किंवा सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि एक युनिक सही करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची सही ही वेळवेगळीच दिसते. आपल्या सहीचा वापर आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर करतो. जसे की, एखादं सरकारी काम किंवा बँकेच्या व्यवहारासाठी देखील सहीचा वापर होतो. कोणत्याही व्यक्तीची सही कोणत्याही सरकारी कागदपत्रासाठी अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच दुसरा कोणताही व्यक्ती त्याला कॉपी करु शकणार नाही, अशा पद्धतीनेच आपल्याला ती करावी लागते. परंतु एका व्यक्तीने अशी काही सही केली आहे की, तिला कॉपी करण्याची हिंमत कोणीही करु शकणार नाही. ज्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका सहीचा आहे. ही सही एका डॉक्टरची आहे. 


या सहीचा फोटो व्हायरल होताच लोकांना धक्का बसला आहे. लोकं सोशल मीडियावरती कमेंट करुन म्हणत आहेत की, या सहीला कॉपी करणं कोणालाही शक्य नाही. ही सही कुठून सुरू होऊन कुठे संपतेय याचा थांग पत्ता लागत नाहीय.



या सहीच्या याच वेगळे पणामुळे लोकांना असे वाटत आहे की, कोणत्याही व्यक्तीने ही सही कॉपी करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला आयुष्यात हे शक्य होणार नाही. कारण या डॉक्टरने आपल्या सहीला Z + सिक्योरिटी लावली आहे.


हा फोटो ट्वीटरवर IAS रुपिन शर्मा यांनी पोस्ट केला आहे. याला पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन लिहिलं 'सिग्नेचर का बाप', हे खरं देखील आहे, ही सही खरोखरंच सगळ्याच सह्यांपेक्षा वेगळी आहे आणि याचमुळे ही सही सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.