Viral Video : गुरांना किंवा पाळिव प्राण्यांना दोरीने बांधून ठेवलेलं आपण अनेकदा पाहिलं असेल. पण कधी कावळ्याला (Crow) दोरीने बांधून ठेवलेलं पाहिलं आहे. कावळ्याच्या सततच्या काव-कावला वैतागून एका व्यक्तीने चक्क कावळ्याला दोरीने बांधलं. यानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. काही सेकंदाच या भागात शेकडो कावळे घिरट्या घालू लागले. यामुळे संपूर्ण परिसर कावळ्यांच्या आवाजाने त्रस्त झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना
हैराण करणाराहा व्हिडिओ आंध्र प्रदेशमधल्या (Andhra Pradesh) आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील टाटीपाका भागातल्या दैनिक बाजारातला आहे. इथल्या एका चिकन शॉप मालकाने कावळ्याच्या आवाजाला कंटाळून कावळ्याल चक्क दोरीने बांधलं. पण काही क्षणातच संपूर्ण बाजारावर शेकडो कावळ्यांनी घिरट्या घालायला सुरुवात केली. एका कावळ्याच्या आवाजाला वैतागलेल्या दुकान मालकाला शेकडो कावळ्यांची काव-काव ऐकावी लागली.


कावळ्यांच्या गोंगाट इतका वाढला की त्यांच्या आवाजाने बाजारातील इतर दुकानदार आणि लोकं अक्षरश: त्रस्त झाली. अखेर सर्वांनी मिळून चिकन शॉपच्या मालकला बांधून ठेवलेल्या कावळ्यची सुटका करण्याची विनंती केली. दुकानदारने जशी त्या कावळयाची सुटका केली. तसं आकाशात घिरट्या घालणारे कावळे अचानक गायब झाले. वातवारण आधी सारखंच सामान्य झालं.



प्राणी प्रेमींचा संताप
कावळ्याला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला. चिकन शॉप मालकावर कारवाईची मागणी प्राणी प्रेमींनी केलीय. तर स्थानिक अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांनी प्राणी किंवा पक्षांशी अमानवीय पद्धतीने वागू नये असं आवाहन केलं आहे.