चंदीगढ : हरियाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भावी उपमुख्यमंत्री म्हणून दुष्यंत चौटाला यांचे नाव पुढे आले आहे. भाजपला त्यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दुष्यंत चौटाला यांचे वडील आणि जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) संस्थापक अजय चौटाला यांना तिहार जेलमधून १४ दिवसांची फर्लो रजा मंजूर झाली आहे. त्यामुले आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तिहार जेलमधून ते बाहेर येतील. शिक्षक भरती घोटाळ्यात चौटाला यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शुक्रवारी रात्री जेजेपी आणि भाजप यांच्यात समझोता झाला आहे. त्याअंतर्गत हरियाणामधील मुख्यमंत्री भाजपचा आणि उपमुख्यमंत्री जेजेपीचे असतील.


हरियाणात भाजप - जेजेपी यांचे सरकार


तत्पूर्वी, प्रमुख दुष्यंत चौटाला शुक्रवारी दुपारी तिहार तुरूंगात वडील आणि आजोबा ओम प्रकाश चौटाला यांना भेटण्यासाठी आले होते. तिहार जेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वडील-मुलाची बैठक सुमारे अर्धा तास चालली.



दुष्यंत यांचे आजोबा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि वडील अजय चौटाला हे जेलमध्ये बराच काळापासून तुरूंगात आहेत. विशेष म्हणजे, ओमप्रकाश चौटाला हे सध्या त्यांचा मुलगा अजय चौटाला यांच्यासह मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.


केवळ १०-११ महिन्यांपूर्वी हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणारा मुलगा दुष्यंत चौटाला यांनी वडील ओम प्रकाश चौटाला यांच्या पक्षाची इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) यांच्यात झालेल्या मतभेदानंतर अजय चौटाला यांनी जननायक जनता पार्टी (जेजेपी) ची स्थापना केली.विधानसभा निवडणुकीत जेजेपीने १० जागा जिंकून सर्वांना चकित केले आहे.