मुंबई : तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, आणि त्यांच्यामुळे तुम्ही परदेशी प्रवासाचा विचार करत नाही. पण आता असं होणार नाही. कारण आता कुत्रा आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकणार आहात. आकासा एअर या नुकत्याच देशातील नवीन देशांतर्गत विमान कंपनीने याची घोषणा केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यासाठी १५ ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरू होणार आहे.


प्राण्यांना ठेवावं लागणार पिंजऱ्यात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकासा एअरचे सह-संस्थापक बेल्सन कुटिन्हो म्हणाले की, लोकांना त्यांचे पाळीव प्राण्यांना फिरायला किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अशा लोकांना मदत करण्यासाठी आता कंपनीने एक ऑफर जाहीर केली आहे. याअंतर्गत ज्या पाळीव प्राण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे, त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. यानंतर प्रवाशासोबत पाळीव प्राण्यालाही त्याच विमानातून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाईल.


Anand Mahindra यांनी सांगितलं संकटांवर मात करण्याचं 'सिक्रेट', म्हणाले...


पुढच्या महिन्यापासून सुरु होणार सुविधा


ते पुढे म्हणाले की, अशा पाळीव प्राण्यांचे वजन किमान 7 किलो आणि जास्तीत जास्त 32 किलो ठेवण्यात आलं आहे. यापेक्षा वजनदार प्राणी असेल तर त्यासाठी विमानातही सुविधा दिली जाईल. 


बेल्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्राण्यांना विमानाने नेण्याची सुविधा नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. अकासा एअरकडे सध्या 6 विमानं आहेत. मार्च 2023 पर्यंत त्यांची संख्या 18 पर्यंत वाढवली जाईल.


Indian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम


पुढच्या वर्षीपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमानं


या एअरलाइन्सचे सीईओ विनय दुबे यांनी सांगितलं की, पुढील वर्षाच्या उत्तरार्धात विमानांची संख्या 20 पेक्षा जास्त होईल. यासोबतच कंपनी आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणं देखील सुरू करणार आहे. या विमानांच्या खरेदीसाठी बोईंग कंपनीला आदेश देण्यात आला आहे. 


दुबे पुढे म्हणाले की, एअरलाईन सेक्टरमध्ये कंपनीत काम करताना 2 महिने झाले आहेत. या दरम्यान आकासा एअरला खूप काही शिकायला मिळालंय. विमान कंपनी नोव्हेंबरपासून एअर कार्गो सेवाही सुरू करणार आहे.