युपीत बसपा-सपा लोकसभेच्या 38-38 जागा लढवणार
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती लखनऊमध्ये पत्रकार परिषद यांची पत्रकार परिषद होत आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली.
पाहा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मायावती यांनी म्हटलं की -
- मोदी आणि अमित शहांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद
- जनहितासाठी ही आघाडी आहे.
- जनविरोधी पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय... याआधीच्या पोटनिवडणुकीत त्य़ाची सुरुवात देखील झाली.
- उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. जर एकत्र लढलो तर केंद्रात भाजपला रोखण्यात मदत होईल.
- भाजपच्या कार्यपद्धतीवर गरीब, दलित, मुस्लीम वर्ग विविध समस्यांमुळे दु:खी आहेत.
- काँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारमध्ये बोफोर्स आणि राफेल भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
- देशात सध्या अघोषित आणीबाणी आहे.
- देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
- आमच्या वेगळ्या लढल्यामुळे इतर जातीयवादी पक्षांना फायदा होतो. वेगवेगळे लढल्याने याआधी देखील काँग्रेस सारख्या पक्षाला फायदा झाला.
- सपा-बसपा देशात यापुढे काँग्रेस सारख्या पक्षासोबत देखील युती करणार नाही. ज्यामुळे आमचं नुकसान होणार नाही.
- लोकसभेत सपा-बसपा एकत्र लढू. केंद्रात भाजपला सत्तेत येऊ देणार नाही.
- राम मंदिराच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळले.
- सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं नाव खराब करण्याचं काम भाजप करत आहे. बसपा त्यांच्या मागे उभी आहे.
- बसपा राज्यात 38 जागा लढवणार असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे.
- सपा देखील 38 जागा लढवणार आहे. 4 जागा इतर पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत.
- लोकसभेनंतर विधानसभेत देखील एकत्र लढू
- केंद्रात आल्यापासून भाजपने सरकारी गोष्टींचा दुरुपयोग केला.
अखिलेश यादव यांनी म्हटलं की -
- भाजपने देशात अत्याचार सुरु केला आहे.
- लोकांना जाती-पातीच्या नावावर लढवण्यात येत आहे.
- निर्दोष लोकांचं एन्काऊंटर केलं जात आहे.
- देशात धार्मिक वाद सुरु आहे. उत्तर प्रदेश आता जाती प्रदेश झाला आहे.
- भाजप सरकार मोठ्या उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- भाजपच्या कुटनीतीचा विनाश करण्यासाठी सपा-बसपाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
- उत्तर प्रदेशमधून भाजपचा सूपडा साफ करु.
- ही फक्त राजकीय एकजूट नसून भाजपच्या अत्याचाराविरोधातील एकजूट आहे.
- मायावती यांनी एकमेकांचा सन्मान ठेवला त्यासाठी मी त्यांना धन्यवाद म्हणतो.
- आम्ही समाजवादी आहोत आणि समाजवादी सुख-दुखात सहभागी असतात.
- मायावती यांचा सन्मान माझा सन्मान आहे.
- भविष्यात बसपा आणि सपा यांची एकजूट आणखी मजबूत होईल.