निवडणूक निकालांवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया, ट्रोलर्सकडून खिल्ली
आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर थोड्याच वेळात अखिलेश यादव यांना ट्रोललाही सामोरं जावं लागलंय.
लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसंच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर भाजपवर जळजळीत निशाणा साधलाय. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाआघाडीबद्दल त्यांनी सकारात्मक भविष्यही व्यक्त केलंय. आपलं हे मत सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर थोड्याच वेळात अखिलेश यादव यांना ट्रोललाही सामोरं जावं लागलंय.
'जब एक और एक मिलकर बनते है ग्यरह... तब बडे-बडो की सत्ता हो जाती है नौ दो ग्यारह' असं अखिलेश यादव यांनी ट्विटरवर म्हटलंय.
त्याचं हे ट्विट राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगाणा विधानसभा निवडणुकीचे कल समोर आल्यानंतर आलंय. या कलांनुसार, काँग्रेसनं पाच पैंकी तीन राज्यांत चांगलीच आघाडी घेतलीय. छत्तीसगडपाठोपाठ राजस्थानमध्येही सत्तांतराची चिन्हं दिसून येत आहेत. तेलंगणामध्येही काँग्रेसलाच बहुमताची आघ्डी मिळाली. तर मिझोराममध्ये जनतेलनं एमएफएन अर्थात मिझो नॅशनल फ्रंटवर विश्वास टाकलाय. दुसरीकडे मध्यप्रदेश मात्र त्रिशंकू परिस्थितीकडे वाटचाल करताना दिसतोय.
या कलांना हाताशी धरून अखिलेश यादव यांनी हे ट्विट केलं. मात्र, उत्तर प्रदेशन विदानसभा निवडणुकीत ते काँग्रेससोबत रिंगणात उतरूनही फारसे कमाल दाखवू शकले नव्हते. देशाच्या या तरुण नेतृत्वांना जनतेनं मात्र नाकारलं... आणि समाजवादी पक्ष सत्तेबाहेरच राहिला.
अखिलेश यादव यांच्या या ट्विटवरून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही. एका युझरनं लिहिलंय 'पिक्चर अभी बाकी है अक्सर ट्रेलर हिट पिक्चर फ्लॉप हो जाती है'... तर आणखी एका युझरनं याला 'चांगला जोक' असल्याचं म्हटलंय... आणखी एका युझरनं तिरसट प्रतिक्रिया देताना 'हा हा हा... योग्य म्हणणं... २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमधून मोठ-मोठ्यांचं सरकार नौ दौ ग्यरह झालं होतं... तुम्ही अनुभवी आहात अखिलेशजी... जय हो' असं म्हटलंय.