Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...
Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Atiq Ahmed Murder : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज (Prayagraj) येथे दोघांना मेडिकल चाचणी घेऊन जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात (Atique Ahmed shot dead) आल्या. पोलीस आणि मीडियाचे पत्रकार समोर असताना लाईव्ह कॅमेऱ्यासमोर (Live) हे हत्याकांड झालं आहे. पत्रकारांच्या वेशात आलेल्या आरोपींनी दोन्ही भावांचा खात्मा केला. या प्रकरणावर सध्या देशभर चर्चा होताना दिसत आहे.
अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Akhilesh Yadav first reaction after Atiq Ahmed murder at Prayagraj)
काय म्हणाले Akhilesh Yadav ?
यूपीमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली असून गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात खुलेआम गोळीबार करून कुणाचा बळी जाऊ शकतो, मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, काही लोक जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे, असं ट्विट अखिलेश यादव केलं आहे.
दरम्यान, माफिया गुंड अतिक अहमद हा बसपा आमदार राजू पाल हत्याकांड (Raju Pal Murder Case) आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal Case) प्रमुख आरोपी होता. त्याचबरोबर खून, खंडणी या प्रकरणात देखील त्याचा हात असायचा. दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद अहमद (Asad Ahmad) याचं पोलीस एन्काऊंटर झालं होतं. त्यानंतर आता अतिक अहमदची हत्या झाली आहे. त्यामुळे आता कायदा व्यवस्थेचे (UP law And Order) तीन तेरा वाजल्याचं दिसून येतंय.