नवी दिल्ली : समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राफेल फाईल चोरी आणि संत बीर नगरातील भाजपाच्या खासदार-आमदार मारामारी प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. काल कर्नाटकच्या कलबुर्गी येथे भाजपाच्या खासदाराने स्वत:च्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने मारहाण केली होती. तसेच राफेल प्रकरणातील महत्त्वाची फाईल चोरीला गेल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी सरकारला धारेवर धरले. जेव्हा पंतप्रधान घुसून मारण्याची आणि सीएम ठोकून काढण्याची भाषा करणार तेव्हा असंच होणारचं असे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सत्ताधारी म्हणतायत की फाईल चोरीला गेली. त्याआधी व्याकरण चुकीवरून भाजपाची नाचक्की झाली. त्यानंतर भाजपाच्या खासदार-आमदार बुट मारीवरून भाजपा पुन्हा खजिल झाला आहे. हेच मुद्दे घेऊन जनते समोर जायचे आहे का ? जनतेला आम्ही काय तोंड दाखवणार ? असे भाजपाचा कार्यकर्ता त्यांच्या नेत्यांना विचारत आहे. 



संत कबीर नगर येथे झालेल्या बूटमारी प्रकरणावर ते म्हणाले, 'जिथे पंतप्रधान घुसून मारण्याची आणि सीएम ठोकून काढण्याची भाषा करणार तिथे असंच होणार.' पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जिथे हाणामारीची भाषा करतात तिथे हाणामारीच होणार असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या भाषा लोकशाहीत वापरल्यामुळे अशा घटना घडतात असे ते म्हणाले.


श्रेयवादावरून भांडण 


भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यामध्ये मिटींगमध्येच बाचाबाची झाली. यानंतर आमदाराने खासदाराला चपलेने मारण्याची भाषा केली. पण याआधीच भडकलेल्या खासदाराने ते कृतीत आणले. स्वत:ची चप्पल काढून तो आमदाराला मारू लागला. आमदाराचा एक हात पकडून त्याला चपलेने डोक्यावर मारायला सुरूवात केली. 
श्रेय घेण्यावरून हा वाद सुरू झाला. भाजपाचे खासदार शरद त्रिपाठी हे संत कबीर नगरचे खासदार आहेत. आमदार राकेश सिंह मेहदावल हे भाजपाचे आमदार आहेत. दोन्ही नेत्यांनी एका मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर श्रेय घेण्यासाठी हा वाद घातला. दरम्यान एकमेकांना शिवीगाळही केली.