Amarnath Yatra 2023 : इथे उत्तराखंडमध्ये (Char Dham Yatra Uttarakhand) चारधाम यात्रेला भाविकांची गर्दी होणं सुरुच असताना तिथे जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) आता अवघ्या काही दिवसांवरच अमरनाथ यात्राही सुरु होणार आहे. 1 जुलै 2023 पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार असून सध्या या यात्रेसाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या यात्रेपूर्वी संरक्षण यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कारण, यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं संकट घोंगावत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं सावट असतानाच इथं भारतामध्ये तातडीनं उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या आणि त्यात काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. संरक्षण यंत्रणांच्या बैठकीनंतर अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरुंना नेणाऱ्या वाहनांचा ताफा जेव्हा जम्मू श्रीनगर महामार्गावरून (Jammu Srinagar Highway) जाईल तेव्हा तिथं इतर कोणत्याही वाहनाला जाऊ दिलं जाणार नाहीये. त्यामुळं कडेकोट बंदोबस्तामध्ये यात्रेकरू पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहेत. 


दरम्यान, भारतीय लष्कराचं (Indian Army) हे सुरक्षा कवच भेदण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी अमरनाथ यात्रेवर डोळा ठेवून असल्याचं म्हटलं जात असून, पाकव्याप्त काश्मीरकमधून यात्रेवर हल्ला करण्याचा कटही रचला जात असल्याची बाब उघड झाली आहे. सीमेपलीकडे असणाऱ्या PoK मध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी तळांवर सातत्यानं बैठका सुरु असून, इथं हल्ल्याचे कट रचले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाक सैन्यातील अधिकारीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असून, अमरनाथ यात्रेदरम्यान आत्मघातकी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी कट रचल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळत आहे. 


पुलवामाची पुनरावृत्ती ? 


प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी पुलवामान येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्याच धर्तीवर पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्याची तयारी शेजारी राष्ट्रातून होत आहे. परिणामी सीमेनजीक असणाऱ्या लष्कराच्या तळांवर दहतवाद्यांच्या संख्येत सातत्यानं भर पडत असून, इथं लष्करातील मोठे अधिकारीच त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेसुद्धा पाहा : Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा... 


सध्याच्या घडीला मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. अमरनाथ यात्रेमध्ये ठिकठिकाणी श्वानपथकं तैनात असणार आहेत तर, अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या धर्तीवर इथं एनडीआरएफची पथकंही तैनात ठेवण्यात आली आहेत.