डेंग्यूचा कहर, 15 दिवसात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त
चिमुकल्याला जन्म देऊन आईचा ही मृत्यू
मुंबई : तेलंगणामध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळतो आहे. डेंग्यूने एक संपूर्ण कुटुंब उद्धवस्त केलं आहे. या कुटुंबात फक्त आता एक लहान चिमुकला वाचला आहे. मुलाची आई, वडील, बहिण आणि आजोबा यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या मंचेयिरयल जिल्ह्यातील एक कुटुंब १५ दिवसात संपलं. बुधवारी १८ वर्षाच्या महिलेचा मुलाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला.
कुटुंबात सगळ्यात आधी महिलेचे पती ३० वर्षीय जी. राजगट्टू यांना डेंग्यू झाला होता. मंचेरियल जिल्ह्यातील श्रीश्री नगरमध्ये हे कुटुंब राहतं. डेंग्यूची साथ असल्याने हे कुटुंब करीमनगर येथे शिफ्ट झालं. पण उपचारादरम्यान १६ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. राजगट्टू येथील ७० वर्षी आजोबा यांना डेंग्यू झाला. त्यानंतर २० ऑक्टोबर दुसऱ्या सदस्याचा मृत्यू झाला.
कुटुंबातील २ जणांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच राजगट्टू यांची ६ वर्षाची श्री वर्षिनी हिचा डेंग्यूने मृत्यू झाला. उपचारादरम्यान दिवाळीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला श्री वर्षिनीचा मृत्यू झाला.
राजगट्टू यांची पत्नी या दरम्यान गरोदर होती. कुटुंबातील ३ सदस्य गेल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यांना ही डेंग्यूची लागण झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा ही मृत्यू झाला. मंगळवारी २८ वर्षाच्या सोनी यांनी मंगळवारी एका मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर बुधवारी ३० ऑक्टोबरला सोनी यांचा ही मृत्यू झाला.
१५ दिवसात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारभारावर यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याआधीच तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने राज्य सरकारला डेंग्यूला रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाय करण्याच्या सूचना केल्या होत्या.