नवी दिल्ली : गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या राजकीय नेत्यांची माहिती त्या-त्या पक्षांनी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये द्यावी अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे. निवडणूक  लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी. जर ही माहिती त्या उमेदवाराने दिली नाही, तर तशी माहिती सुप्रीम कोर्टाला कळवा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर राजकीय पक्षांनी अशी माहिती दिली नाही, तर तो सुप्रीम कोर्टाचा अवमान ठरेल या शब्दात राजकीय पक्षांना तंबी देण्यात आली आहे. २५ सप्टेंबर २०१८ मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना याबाबत सूचना केली होती. मात्र राजकीय पक्षांनी ती फारशी मनावर न घेतल्याने आता सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेत याबाबत स्पष्ट सूचना केल्यात. 


दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत काँग्रेसने केलं आहे. त्या शिवाय ज्या ज्या उमेदवारांनी गुन्हे लपवले आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.