नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आयुष्यावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा येत आहे. नुकतेच होळीच्या निमित्ताने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सिनेमाच्या माध्यमातून मोदी स्वत:चा अजेंडा लादण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका अनेकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी देखील आपली तक्रार सोशल मीडियावर मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बॉलीवुडमधील प्रसिद्ध जावेद गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी फिल्मवरील आपल्या नावावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सिनेमाच्या क्रेडीट लाईनमध्ये गीतकार म्हणून जावेद अख्तर यांच्यानावाचा उल्लेख आहे. पण जावेद यांनी या सिनेमात एकही गाणे लिहिले नाही. जावेद यांनी ट्वीट करुन यासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. 'मी सिनेमाच्या पोस्टरवर माझे नाव पाहून हैराण आहे. मी सिनेमासाठी कोणतेही गाणे गायले नाही' असे ट्वीट त्यांनी केली आहे. 




पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत झळकणार असून, नुकतंच चित्रपटातील विवेकच्या नव्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला आहे. संन्यासी, तरुण, मध्यमवयीन व्यक्ती अशा विविध रुपांमध्ये तो पाहायला मिळत आहे.


पंतप्रधान मोदींवर बायोपिक का?



 'मी पंतप्रधान मोदींवर या करता सिनेमा करू इच्छितो कारण त्यांच जीवन प्रेरणादायी आहे, निर्माता संदीप सिंह यांनी म्हटले आहे. जेव्हा मी इतरांनी ही कल्पना सांगितली तेव्हा मला खूप सकारात्मक उत्तर मिळाली. पण ही गोष्ट अधिक रिस्की आहे. कारण आताच्या पंतप्रधानांबद्दल लोकांच्या मनात अनेक विचार आहेत. गेल्या चार वर्षांपासून मी या करता सिने जगतातून सहयोग मागितला आणि मला तो मिळाल्याचेही सिंह म्हणाले. हा सिनेमा मोदींच्या तरूणपणापासून सुरू होतो म्हणून मला अशी व्यक्ती हवी होती, जी त्यांचा 20 ते 60 वर्षांपर्यंतचा प्रवास मांडू शकेल. याबाबत विवेक योग्य कलाकार असल्याचेही ते म्हणाले.