नवी दिल्ली : अमरनाथच्या यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील मृतांची संख्या ८ वर गेली आहे. रात्री उपचारादरम्याने गुजरातच्या ललिता बेन यांचा मृत्यू झाला आहे.  


ललिता बेन यांना उपचारासाठी श्रीनगर येथील SKIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याआधी ७ जणांचा जागीत मृत्यू झाला होता. तर २१ जण जखमी झाले होते.