अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा केलाय.
श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा केलाय. जम्मू काश्मीर पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या हल्लयात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचं मुनीर खान यांनी सांगीतलंय.
इस्माईल नावाच्या पाकिस्तानातील दहशतवाद्यानं दोन पाकिस्तानी साथीदारांच्या सहाय्यानं हा हल्ला केला. यात त्यांना एका स्थानिक दहशतवाद्यानं मदत केल्याची माहिती मुनीर खान यांनी दिली.
हे दशतवादी ९ जुलैला हा हल्ला करणार होते मात्र त्या दिवशी सीआरपीएफ आणि यात्रेकरुंच्या गाड्यांची कोणतीही मुव्हमेंट झाली नाही. मात्र १० जुलैला यात्रेकरुंची एक गाडी मागे राहिल्याची संधी साधून या अतिरेक्यांनी अंधाराचा फायदा घेत हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवद्यांना मदत करणा-या तीन स्थानिकांना अटक केली आहे.