नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने सध्या ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील पर्यटकांना काश्मीर खाली करण्यास सांगण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षकांना अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत एक स्नाईपर गन मिळाली आहे. त्यानंतर ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचं कळताच सर्व यात्रा रोखण्यात आल्या आहेत. पर्य़टकांच्या सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या लोकांना लवकरात लवकर काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आहे.



जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटलं की, राज्यात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. ही यात्रा 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती पण त्याआधीच ती थांबवण्यात आली आहे.


सुरक्षा रक्षक अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या लोकांसाठी दिवसरात्र तैनात असतात. हल्ल्याची दाट शक्यता असल्याने सुरक्षा रक्षकांना हायअलर्टवर ठेवण्यात आलं आहे.