Amazon India Food delivery Business: ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियानं (Amazon India) आपला फूड डिलिव्हरी (Food Delivery) व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉननं रेस्टॉरंट भागीदारांना स्पष्ट सांगितलं आहे की, 29 डिसेंबरपासून फूड डिलिव्हरी सेवा बंद होणार आहे. ही माहिती कंपनीने मेल करून रेस्टॉरंट भागीदारांनी दिली आहे. अ‍ॅमेझॉननं ही सेवा 2020 मध्ये सुरु केली होती. मेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, 'कंपनीने नवा निर्णय घेतला आहे. आता 29 डिसेंबरनंतर तुम्हाला अ‍ॅमेझॉन फूडच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑर्डर मिळणार नाहीत. परंतु तुम्हाला शेवटच्या तारखेपर्यंत सेवा द्यावी लागेल. आम्ही आशा करतो की, तुम्ही सूचनेचं पालन करून ऑर्डर्स पूर्ण कराल.' दुसरीकडे ही सेवा बंद करत असताना अ‍ॅमेझॉननं रेस्टॉरंट भागीदारांना त्यांच्या पेमेंट बाबतही स्पष्ट सांगितलं आहे. अ‍ॅमेझॉननं मेलमध्ये सांगितलं आहे की, 'आपल्या रेस्टॉरंट भागीदारांची देयके आणि इतर कराराच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करेल.' रेस्टॉरंट्सना 31 जानेवारी 2023 पर्यंत सर्व Amazon टूल्स आणि रिपोर्ट्समध्ये प्रवेश असेल. कंपनी येत्या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत तक्ररारींचं निवारण करेल. 


Amazon Academy  बंद होणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅमेझॉनने 2021 च्या सुरुवातीला भारतात 'Amazon Academy' लाँच केली आहे. आता कंपनीने आपली ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल 'अमेझॉन अ‍ॅकॅडमी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर, Amazon व्हर्च्युअल कोचिंग आणि IIT-JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षांसाठी Test Preperation सेगमेंट प्रोवाइड करेल.


बातमी वाचा- Knowledge News: एसीमध्ये 'टन' हा प्रकार काय असतो? जाणून घ्या योग्य उत्तर


कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'Amazon Academy चे ऑपरेशन टप्प्याटप्प्याने ऑगस्ट 2023 पासून बंद करेल. वर्तमान बॅच चाचणी तयारी मॉड्यूल पूर्ण करेल. आम्ही आमच्या ग्राहकांना समर्पित आहोत आणि त्यांना खात्री देऊ इच्छितो की या निर्णयाचा आमच्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.'