मुंबई : देशातील अग्रगणी ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या घटवण्यास सुरुवात केलीये. कंपनीने एक आठवड्याआधी ६० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. अॅमेझॉन जगभरात पसरलेला बिझनेस रि-स्ट्रक्चर करतोय. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटवली जातेय. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी येणाऱ्या काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू शकते. 

 

२५ टक्के कर्मचाऱ्यांना पीआयपीमध्ये टाकले


इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार अॅमेझॉनच्या दोन कर्मचाऱ्यांना दावा केलाय की कंपनीने २५ टक्के कर्मचार्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लानमध्ये टाकलंय. अॅमेझॉन इंडियाने कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतच्या बातमीला दुजोरा दिलाय.फेब्रुवारीमध्ये अॅमेझॉनने सिएटल हेड ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होका. गेल्या काही महिन्यांपासून अॅमेझॉन इंडिया बिझनेससाठी नवा प्लान तयार करतेय. कंपनी या प्लानअंतर्गत ते आपल्या कर्मचाऱ्यांना काढून इतर ठिकाणी शिफ्ट करतायत.