West Bengal: कधी कुणावर काय वेळ येईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आपल्यालाही अनेक अशा वेळी काय करावं हे सुचतं नाही. त्यातून कठीण आणि अवघड प्रसंगात कधी आपण काय करावं हेही आपल्याला सुचत नाही. सध्या अशीच एक वेळ एका तरूणावर ओढवली आहे. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी (Bengal news) या जिल्ह्यात एका तरूणाकडे आपल्या आईला रूग्णवाहिकेतून (Ambulance) घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चक्क त्याच्या आईचा मृतदेह (Dead Body of mother) त्याला आपल्या खांद्यावरून घेऊन जावा लागला. त्यानं चक्क आपल्या आईचा मृतदेह 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी पायी घेऊन गेला. हा घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि त्याचसोबत तुमच्या डोळ्यात पाणी देखील येईल. (ambulance unaffordable fees a young man carries his mother dead body own and walks)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, या तरूणाचं नावं राम प्रसाद दिवाण (Ram Prasad Divan) आहे. यानं आपल्या आईचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि तो खांद्यावर घेतला आणि आपल्या आईला घेऊन तो सरळ आपल्या गावी पायी चालायला लागला. त्यावेळेला त्यांचे वृद्ध वडीलही त्याच्यासोबत होते. 


नक्की कुठे आणि कोणी केली मदत?


अशा कठीण प्रसंगात शेवटी मदत करण्यासाठी एक सामाजिक संस्था पुढे आली त्यांनी त्याला एक गाडी दिली ज्यात त्यांच्या आईला तो पुढे घेऊन गेला. त्याच्या गावाच्या जिल्ह्यात क्रांती ब्लॉक होता तिथं त्याला तो त्याच्या आईलाही घेऊन गेला. या तरूणाला मदत करणाऱ्या या सामाजिक संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यानंही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोप केला आहे. रूग्णवाहिका चालक हे मोफत सेवा देणाऱ्या रूग्णालयात फिरत असतात परंतु तरीही त्यांना या घटनेचे गांभीर्य कळू नये, परंतु रूग्णवाहिका संघटनेनं हे आरोप मात्र फटाळून लावले आहेत, आणि आपल्या चुकांची पाठराखण करत रेल्वे आणि रस्ते अपघातादरम्यानही मोफत सेवा (Ambulance service near me) देतात असं म्हटलं आहे. 


यावर रूग्णालय अधीक्षक कल्याण खान (Kalyan Khan) यांनीही ही घटना फार दुर्देवी आहे असं म्हटले परंतु त्यांनीही काही गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला माहिती असते तर आम्ही त्या गरीब तरूणासाठी व्हॅनची व्यवस्था करू शकलो असतो, आम्ही हे नियमितपणे करतो. त्याच्या घरच्यांना बहूधा या मदतीची कल्पना नसावी. त्यानं आमच्याशी संपर्क साधला नाही. 


नक्की काय घडलं


दिवाण यांना रूग्णालयात नेणाऱ्या रूग्णवाहिकेचे 900 रूपये शुल्क भरणे परवडणारे नव्हतेच परंतु त्या रूग्णवाहन चालकांनं आईचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी तीन हजार रूपये घेणार असं सांगितले जर त्यांना भरणे मुळीच परवडणारे नव्हते. त्यांच्या 72 वर्षीय आईला श्वासोच्छवासाचा त्रास होता. त्यांनी बुधवारी त्यांच्या आईला रूग्णालयात नेले होते आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले.