पंजाबी गाण्यावर भांगडा करणं कोणाला आवडणार नाही गाण लागताच आपोपाप आपले पाय ताल धरायला लागतात पंजाबी गाण्यांची क्रेझ नुसती पंजाबमध्ये किंवा भारतात नाहीये तर जगभरात या गाण्यांची क्रेझ आहे.नुकताच एक व्हिडीओ समोरासमोर आला आहे ज्यात एक अमेरिकन महिला एमी वीकच्या गाण्यावर ताल धरताना पाहायला मिळतेय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


भांगडा दिसायला सोपा असला तरी त्यातील काही स्टेप्स करणं थोडं कठीण आहे पण या अमेरिकन महिलेने सगळ्या स्टेप्स अगदी मस्त उत्तमरीत्या केल्या आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तिने एकदम धम्माल डान्स केलाय.या मुलीचे नाव ओमाला असून ती पंजाबी गाणी आणि भांगड्याची फॅन आहे. जर तुम्ही तीचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहाल तर तुम्ही थक्क व्हाल भांगडा करताना भले भले थकून जातात पण या महिलेची एनर्जी पाहून खरच तीचं कौतुक करावं लागेल.इतकचं नाही तर तीची एनर्जी लेव्हल पाहून लोक आश्चर्यचकित होतात. ज्यांना वाटते की जाड लोक नाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी ओमाला हे एक उदाहरण आहे.