नवी दिल्ली : 'तुम्ही माझा सन्मान करायला पाहिजे. हा सन्मान तुम्ही इतक्याचसाठी करायला हवा कारण, राजकारणातील मी सर्वात कमी वयाचा आडवाणी आहे'. हे विधान आहे आम आदमी पक्षाचे नेत कुमार विश्वास यांचे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे आपल्या मनातील वेदना बोलून दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी सर्वात कमी वयाचा आडवाणी आहे, हे मी स्वस्त: सांगतो आहे. इतर कोणी हे सांगण्यापूर्वी मीच सांगितलेले बरे', असे म्हणत कुमार विश्वास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.


मोदींवर साधला निशाणा


अमेठी येथील शिवदुलारी डिग्री कॉलेजमध्ये रंगलेल्या कवी संमेलनाला कुमार विश्वास यांनीही हजेरी लावले. या संमेलनात आपल्या खास शैलीत शायरी सादर करत विश्वास यांनी वेगळाच रंग भरला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले, सर्वसामान्य भारतीयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी नरेंद्र मोदी कष्ट करून पैसे जमा करत आहेत आणि तेवढ्यात कोणीतरी डल्ला मारून ते पैसे घेऊन भारताबाहेर पळत आहे. आगोदर मल्याने या पैशांवर डल्ला मारला. तो धक्का पचतो न पचतो तोवर नीरव मोदीने डल्ला मारला. 


राहुल गांधीवरही निशाणा


राहुल गांधीवर निशाणा साधताना कुमार विश्वास म्हणाले, अमेठी हा राहुल यांचा पारंपरीक मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणावरून ते खासदार आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. असा नेता निवडल्याबद्दल अमेठीच्या जनतेला माझा प्रणाम.