ISRO chief on aliens : विश्वाचा पसारा नेमका किती मोठा आहे? या जगात मानवाशिवाय आणखी किती सजीवांचा वावर आहे? परग्रहावर जीवसृष्टी आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी सध्या संशोधन क्षेत्रात अनेक गोष्टींवर अभ्यास सुरु आहे. नासासह इस्रोनंही यासाठीच्या निरीक्षण आणि परीक्षणांमध्ये सहभाग घेतला आहे. पण, अद्यापही पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टीचा वावर आढळलेला नाही. पण, इस्रो प्रमुखांनी नुकतंच केलेलं वक्तव्य पाहता, एलियन आणि त्यांच्या अस्तित्वाविषयीचा एक नवा सिद्धांत समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मांडात एक दुसरी जीवसृष्टी असून, त्यांच्या मते एलियनही अस्तित्वात आहेत. एलियन अस्तित्वात आहेत हे समजून घेण्यासाठी ISRO प्रमुखांनी काही महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित केले. 100 वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानाशी तुलना केल्यास हल्लीचं तंत्रज्ञान प्रचंड प्रगत असल्याचं ते म्हणाले. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी डबल एलियन सिविलायजेशनचा एक वैचारिक प्रयोगही मांडला. सोमनाथ यांच्या सिद्धांतानुसार असं गृहित धरा की दोन एलियन जीवसृष्टी आहेत. एक मानवी संस्कृतीच्या काही पावलं पुढे, तर एक मानवी संस्कृतीच्या मागे. 


हेसुद्धा वाचा : नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य


ISRO प्रमुखांच्या मते गृहित धरलेल्या या दोन संकल्पना विकासाच्या एका विशाल शक्यतेकडे खुणावतात ज्यानुसार एलियनचं अस्तित्वं असल्याचं समजलं जातं. त्यांच्या मते एलियन आणि तत्सम सभ्यता किंवा हे वेगळं विश्व मानवी जीवनापासून साधारण 1000 वर्षे पुढं असून, त्यांचं अस्तित्वं मानवाच्याही आधीपासून असू शकतं. किंबहुना ते मानवाशी संपर्क साधण्याा प्रयत्नही करत असावेत पण, आपण मात्र ते समजूच शकत नाही आहोत. खुद्द इस्रो प्रमुखांनीच मानवी अस्तित्वं आणि एलियनचं विश्व यासंदर्भात मांडलेल्या या सिद्धांनी तुम्हीही भारावलात ना? 


एलियन किंवा समांतर विश्वासंदर्भात अनेक संकल्पना आणि सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. पण, तरीही इस्रोप्रमुखांनी त्याबाबत केलेलं हे वक्तव्य प्रमाण ठरू शकतं असं म्हणणंही इथं अतिशयोक्ती ठरणार नाही.