नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीतींचा विजय आहे’, असे ते म्हणाले.


जातीवाद - वंशवादाचा पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते पुढे म्हणाली की, ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आपली लोकशाही बदलत आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये वंशवाद आणि जातिवादाचा पराभव झाला. गुजरातमध्ये भाजपचं जनसमर्थन १.२५ टक्के वाढलं आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली आहे’. हिमाचल प्रदेशबाबत ते म्हणाले की, भाजपला मिळालेलं बहुमत हे दर्शवतं की, लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास यात्रेसोबत चालायचं आहे. 





२०१९ मध्ये आम्हीच सत्तेवर येऊ


आम्हाला विश्वास आहे की, २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवू तेव्हा आमचाच विजय होईल. तसेच देशातील तरूणांचा आणि लोकांचं त्यांना समर्थन मिळेल. 



गुजरातमध्ये भाजपला सत्ता टिकवणे फारच कठिण झाले होते. मात्र तरीही त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. पण सत्ता स्थापन करताना २२ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता असलेल्या भाजपची चांगलीच दमछाक बघायला मिळाली. 


पंतप्रधान मोदींचे ट्विट


पंतप्रधान मोदींनी हिमाचलमधील विजयानंतर ट्विट करत लिहिले की, ‘हिमाचल प्रदेशमध्ये कमळ उमललं, विकासाचा मोठा विजय झाला. गुजरात आणि हिमाचलमधील निवडणूक निकालांवर हे स्पष्ट होतं की, देशातील लोक आता चांगल्या राजकारणाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला समर्थन देतात’.