Delhi Murder: राजधानी दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा हत्याकाडांने हादरली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची आरोपीने लोकांदेखत अत्यंत निर्घृपणणे हत्या केली. आरोपीने आधी तरुणाला 22 वेळा चाकूने भोसकलं आणि नंतर दगडाने ठेचलं. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या शेजारी गुन्हा घडत असताना एकाही व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हा हत्याकांड सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात आपण हत्या केल्याचं त्याने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीचं नाव साहिल असून तो एसी दुरुस्तीचं काम करतो. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी रात्रभर त्याची चौकशी केली. यादरम्यान त्याने आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


साहिलने दावा केला आहे की, पीडित  तरुणीला आपल्याशी ब्रेक अप करायचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे तीन वर्षांपासून एकत्र होते. यानंतर तरुणीने हे नातं संपवण्याचा विचार केला होता. 


रविवाली संध्याकाळी तरुणी आपल्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला निघाली होती. यावेळी साहिलने तिला रस्त्यात गाठलं आणि सर्वांसमोर चाकूने भोसकलं. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, साहिलने चाकूने वार केल्यानंतर काही वेळाने तरुणी खाली कोसळते, मात्र यानंतरही साहिल तिच्यावर वार करत राहतो. साहिल तब्बल 22 वेळा तिच्यावर वार करतो. यादरम्यान तो तिला लाथाही मारतो. पण यानंतरही तो थांबत नाही. यानंतर तो एक मोठा दगड उचलतो आणि चार वेळा तिच्या डोक्यात घालतो. 



धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा साहिल तरुणीची हत्या करत होता, तेव्हा तेथून लोक जात होते. पण जणू काही झालेलंच नाही अशा स्थितीत ते सगळे निघून जात होते. एकानेही आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 


हत्या केल्यानंतर साहिलने पळ काढला होता. त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू नष्ट केला आणि बुलंदशहरला जाणारी बस पकडली. तिथे जाऊन तो आपल्या मावशीच्या घरी लपला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी वारंवार दुर्लक्ष करत असल्याने आपण संतापलो होतो असं आरोपीने सांगितलं आहे. 


तरुणीने आरोपीला जर आपल्यापासून अंतर ठेवलं नाही तर पोलिसांकडे जाऊ अशी धमकी दिली होती. एकदा तर तिने खेळण्यातील पिस्तूल दाखवत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. हत्येच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचं आपल्या जुन्या प्रियकराशी सूत जुळल्याची साहिलला शंका होती.


पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. साहिलने तरुणीशी मैत्री करण्यासाठी नाव बदललं होतं याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान तरुणीची हत्या झाल्यानंतर 25 मिनिटं तिचा मृतदेह तिथेच पडून होता. अखेर एका व्यक्तीने फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीच्या शरिरावर 34 जखमा असून तिची कवटी फुटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.