भूकंपाने लडाख हादरले, रिश्टर स्केलवर इतकी तीव्रता
पहाटे लडाखचा (Ladakh) परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
लडाख : आज भारतात भूकंपाचा तीव्र झटका बसला. शनिवारी पहाटे लडाखचा (Ladakh) परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पहाटे लोक झोपेत असताना भूकंपाने जागे झालेत. या भूंकपाची तीव्रता जास्त असल्याने सर्व जण हादरवून गेले होते. या भूकंपाने घरांना हादरा बसला होता. (Earthquake in Ladakh)
लडाखमध्ये भूकंपाचे धक्के
आज पहाटे 5:11 वाजता लडाखला भूकंपाचा झटका बसला. रिश्टर स्केलवर (Richter Scale) 6.6 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (National Center for Seismology) माहितीनुसार आज सकाळी 5.11 वाजता लडाखमध्ये भूकंप झाला. (Earthquake in Ladakh) रिश्टर स्केलवर 3.6 भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे.
भूंकपाच्या हादऱ्याने लोक जागे
आज लडाखमध्ये भूकंपाचे तीव्र झटके बसले. (Earthquake in Ladakh) या भूकंपाच्या धक्क्याने लडाखमधील काही परिसर हादरला. झोपेत असताना भूकंप झाल्याने लोकांना काय झाले, हेच समजले नाही. घरांना हादरा बसला होता. लोक भीतीच्या छायेखाली होती. भूकंप झाल्याचे समजताच लोकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी गोंधळाचे वातावरण दिसून आले. भूकंपामुळे घरांना हादरा बसला त्यावेळी सीलिंग फॅन आणि इतर वस्तू हलताना दिसून आल्या.
कोणतेही नुकसान नाही!
दरम्यान, या भूकंपाचे केंद्रबिंदू समजू शकलेले नाही. राष्ट्रीय भूगर्भशास्त्र केंद्राकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. भूकंप केंद्र कुठे आहे याचा शोध घेत आहे. मात्र, भूकंपामुळे लडाखमध्ये आतापर्यंत मोठे नुकसान तसेच जीवित हानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातही भूकंपाने लडाख हादरला होता. गेल्या महिन्यात 18 फेब्रुवारीला लडाखमध्ये पहाटेच्या वेळी भूकंप झाला होता. त्यानंतर रिश्टर स्केलवर भूकंप 3.7 होता. मात्र, त्यावेळी कोणतेही नुकसान झालेले नव्हते.