फक्त १० मिनिटात पॅनकार्ड बनवण्याचा सोपा मार्ग
पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात.
मुंबई : आजच्या दिवसांमध्ये सर्वच छोट्या मोठ्या कामांसाठी पॅन कार्डची गरज भासत असते. पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात. परिणामी प्रचंड नुकसानाचा सामना तर कारावा लागतो. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे वेळ देखील वाया जातो. परंतु पॅन कार्डची गरज पाहता आता पॅन कार्ड बनवणं अत्यंत सोपं काम झालं आहे. त्यामुळे येत्या काळात १८ वर्षाच्या पुढे पॅन कार्ड काढण्यासाठी अधिक वेळ खर्च होणार नाही. आधार कार्डच्या मदतीने काही मिनिटांत ई-पॅन देण्यात येईल.
या कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे
आयकर जमा (Income Tax ) करताना, इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरताना, बँक खाते उघडताना, डिमॅट खाते उघडताना आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक असते.
Income Tax Departmentच्या म्हणण्यानुसार इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत पॅन कार्ड तयार करण्यास केवळ १० मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ७ लाख पॅनकार्ड देण्यात आली आहेत.
जर तुम्हाला पॅन कार्डची अत्यंत गरज असेल तर आधार कार्डच्या आधारावर फक्त १० मिनिटांत आता पॅन कार्ड मिळू शकतो. पॅन कार्डसाठी इन्स्टंट पॅन सुविधेद्वारे तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी तपशील फॉर्म भराण्याची गरज नाही.
तुमची सर्व माहिती आधार कार्डवरून घेतली जाते आणि पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होतो. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत तयार झालेला पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्राप्त होईल. ज्यामध्ये एक QR Code असेल.
यात तुमचे नाव, जन्म तारीख, फोटो इत्यादी महत्वाची माहिती असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-पॅन डाउनलोड करावा लागेल. सर्व महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला १५ अंकांचा Acknowledgment number येईल. शिवाय तुमच्या Mail Id वर देखील पॅन कार्ड येईल.