Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका वयस्कर व्यक्तीने गाय, मादी श्वानासह अनेक जनावरांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्रा या परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वयस्कर व्यक्तीला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (दक्षिण) रवींद्र कुमार यांनी सांगितलं आहे की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. विजेंद्र मिश्रा असं या 62 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस उपायुक्तांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड सहिता कलम 377 (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने याआधीही अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. त्याच्याविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितलं आहे की, "पोलीस तपासादरम्यान आम्हाला अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले ज्यामध्ये आरोपी विजेंद्र मिश्राने सार्वजनिक ठिकाणी जनावरांवर लैंगिक अत्याचार केल्याचं दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या आरोपी मानसिकरित्या आजारी असल्याचं दिसत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे".


पाळीव कुत्र्यासह दुष्कृत्य


याआधी बुलंदशहर शहरातूनही असं प्रकरण समोर आलं होतं. येथे एका 65 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीने पाळीव कुत्र्यासह दुष्कर्म केलं होतं. पाळीव कुत्र्यासह दुष्कर्म केलं जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कुत्र्याचा मालक प्रेमचंद वर्मा उर्फ बबलीने कोतवली पोलीस ठाण्यात पोहोचत वयस्कर व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. यानंतर आरोपी अनिल शर्मा याला अटक करत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती.