Anand Mahindra यांनी अशी कोणती ऑफर दिली? लोकं इंटरनेट पालथं घालतायेत!
Anand Mahindra यांची चाहत्यांना भन्नाट ऑफर, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या अन् मिळवा...
Anand Mahindra Twitter Quiz : महिंद्रा अॅड महिंद्रा कंपनीचे (M&M) चेअरमन आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर (Anand Mahindra Twitter) अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतं. अनेकदा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आनंद महिंद्रा वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. आगळ्या वेगळ्या व्हिडीओचा त्यांच्याकडे साठा असतो, असं म्हटलं तर हरकत नसावी. अशातच आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. त्यांच्या या व्हि़डीओ सध्या जोरदार चर्चा (Fantastic offer from Anand Mahindra) होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलंय... आनंद महिंद्रा यांची भन्नाट ऑफर...(Anand Mahindra amazing offer to fans just answer one question and get a tractor)
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. एक व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लोकांना एक प्रश्न विचारलाय (Anand Mahindra Twitter Quiz). बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तीला ट्रॅक्टर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता लोकं अख्खं इंटरनेट पालथं घातलाना दिसत आहेत. आनंद महिंद्रा आपल्या शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे नेटकरी आनंद महिंद्रांच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात व्यस्त आहेत.
आणखी वाचा- श्रीमंती असावी तर अशी! Anand Mahindra प्रवासासाठी या गाड्यांना देतात पसंती
काय म्हणाले Anand Mahindra ?
"नक्कीच हे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत. मात्र, हे कोणत्या देशाचे आहे? बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तीला मी फोटोमध्ये दाखवलेल्या स्केल मॉडेलचा ट्रॅक्टर पाठवीन.", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ-
व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Anand Mahindra Twitter Video) अनेक ट्रॅक्टर एका रांगेत उभे असल्याचं दिसतंय. पहिला ट्रॅक्टर ट्रॉली शिलाई मशीन आणि इतर गोष्टींनी सजवण्यात आलंय. कोणा एका कार्यक्रमासाठी ही सजावट केल्याचं समोर आलंय. तसेच ट्रॅक्टरवर एक महिला हसताना दिसतेय. त्याच्या ट्रॉलीवर लाकडी नावाची सजावट करण्यात आली आहे. एक स्त्री आणि एक पुरुष काचेच्या केबिन असलेल्या ट्रॅक्टरजवळ एका रांगेत उभे असल्याचं दिसतात. या ट्रॅक्टरची ट्रॉलीही सजलेली दिसत आहे. तुम्हाला आनंद महिंद्रांच्या प्रश्नाचं उत्तर समजल्यास तुम्हीही टॅक्टर मिळवू शकता.