आनंद महिंद्रा यांना हवंय `या` प्रश्नाचे उत्तर; Video शेअर करत दिले चार पर्याय
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न विचारला आहे
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर (Twitter) अनेकदा ते प्रेरणादायी, मजेदार किंवा आश्चर्यकारक व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत असतात.
यावेळेही आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक अनोखा व्हिडीओ (Viral Video) पोस्ट केला आहे. या व्हिडीओसह आनंद महिंद्रा यांनी कौन बनेगा करोडपती या टिव्ही प्रोग्रामसारखे चार ऑप्शन दिले आहेत.
या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या घराचे मुख्य गेट कारच्या एका भागाला जोडल्याचे दिसून येते. यामुळे पहिल्यां पाहताना तो दरवाजा नसून कार वाटते. हा विचित्र व्हिडिओ शेअर करून महिंद्रा यांनी यूजर्सना चार पर्यायही दिले आहेत.
महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत विचारले की तुम्ही या व्यक्तीला कसे पाहता - कार प्रेमी, अशी व्यक्ती जी कोणालाही घरात येऊ देऊ इच्छित नाही, विनोदाची अभिनव कल्पना नाहीतर वरील सर्व पर्याय?
हा व्हिडिओ पाहून युजर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती जुगाड विद्यापीठातून पदवीधर असल्याचेही एका यूजरने म्हटले आहे.
आतापर्यंत पाच लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर दीड हजार लोकांनी त्याला रिट्विट केले आहे आणि १८ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.