महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर (Twitter) अनेकदा ते प्रेरणादायी, मजेदार किंवा आश्चर्यकारक व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक अनोखा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) माजी प्रशिक्षक सब मेजर स्वामी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. यादरम्यान मेजर स्वामी यांनी व्हीलचेअरवरून उठून कडक सॅल्यूट दिला. एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा सॅल्यूटचा हा व्हिडिओ समोर आला आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, "राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर, सब मेजर स्वामी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित केले. त्यांनी भारतीय लष्कराच्या 7 जनरलना सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी आपल्या गुरूंचा सन्मान करण्याची भारतीय परंपराही सांगितली. जेव्हा त्यांनी उठून सॅल्यूट केला तेव्हा माझ्या अंगावर काटे उभे राहिले. हे माझे #MondayMotivation आहे."



हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्याला 3 हजाराहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. सर्व यूजर्स मेजर स्वामींच्या या कृतीला सलाम करत आहेत. यासोबतच त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यायला हवी असे युजर्स म्हणत आहेत.


दरम्यान, भारतीय लष्करासाठी (Indian Army) आजचा दिवस खूप खास आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) सोमवारी स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) औपचारिकपणे समाविष्ट केले. यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण हे हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.