Anand Mahindra Share Viral Video: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सर्वेसर्वा आणि उद्योगपती आनंद महिंद्र सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधतात. त्यांनी शेअर केलेले प्रेरणादायी व्हिडीओ नेटकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओत वेगवेगळी हस्ताक्षरांची शैली दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी सूचक कॅप्शनही लिहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दहावी, अकरावी, बारावीसह एमबीबीएस, पोस्ट ग्रॅज्युअशन, ज्युनिअर आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचं हस्ताक्षर दाखवण्यात आलं आहे. या प्रत्येक हस्ताक्षरातील बदल दाखवण्यात आला आहे. सुरुवातीला सुंदर असलेलं अक्षर नंतर कसं होत जातं याबाबत दाखवण्यात आलं आहे. तसं पाहिलं तर डॉक्टरांनी लिहिलेली औषधं सहज समजणं कठीण असतं. प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेली औषधं डॉक्टर आणि मेडिकलमधील व्यक्तीलाच कळतं, याचा अनुभव आपण आतापर्यंत घेतलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, 'आनंददायक. पण खरं आहे...'



आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकींनी हा व्हिडीओ पाहिला असून रीट्वीट केला आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स आपल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत.