Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function Mukesh Ambani Video: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरामधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंद आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीची म्हणजेच प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये हजारो सेलिब्रिटी उपस्थित राहणार असून यामध्ये परदेशी पाहुण्यांचाही समावेश असणार आहे. या दिमाखदार सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून 51 हजार स्थानिकांना मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी जोगवाड गावातील अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमामध्ये चक्क मुकेश अंबानी आणि अनंत अंबानींबरोबरच अंबानी कुटुंबाची होणारीसून राधिका मर्चंटने गावकऱ्यांना स्वत:च्या हाताने जेवायला वाढलं.


प्रत्येकाला नमस्कार करुन वाढलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानींनी स्वत: गावकऱ्यांच्या पंगतीमध्ये जेवायला वाढलं. अंबांनी या पंगतीमध्ये प्रत्येकाला हात जोडून नमस्कार करुन लाडूचं वाटप केलं. तर अनंत अंबानींनी या पंगतीमध्ये भजी वाढल्या. गुजराती पद्धतीचं जेवण गावऱ्यांना देण्यात आलं. अंबांनीसारख्या व्यक्तीने अशापद्धतीने नम्रपणे पंगतीमध्ये अगदी प्रत्येक सर्वसामान्य गावकऱ्याला नमस्कार करुन अन्नसेवा केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 


2500 पदार्थांचा मेन्यू


अंबानींनी आयोजित केलेल्या प्री-वेडिंग पार्टीचा मेन्यू फारच खास असणार असून यामध्ये तब्बल 2,500 प्रकारचे पदार्थ मेन्यूमध्ये असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांच्या आवडीनिवडीनुसार पदार्थ तयार केले जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांच्या आवडीनिवडीसंदर्भातील माहिती मागवण्यात आली असून त्याप्रमाणे मेन्यू निश्चित करण्यात आला आहे. त्यापूर्वी गावकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणामध्येही विशेष मेन्यूचा समावेश होता. फक्त गावकऱ्यांना खास गुजराती पद्धतीचं जेवण देण्यात आलं. या पंगतीला स्वत: अंबानी कुटुंबातील सदस्यांनी जेवण वाढलं. या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झालेत.


नक्की पाहा >> Video: नागपुरकर चहावाल्याच्या टपरीवर चहा प्यायला पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, 'भारतात..'


मुकेश अंबानींनी पंगतीत जेवण वाढलं तो व्हिडीओ...



अनंत अंबानींनी जेवण वाढलं...



ब्रेकफास्टमध्ये 70 पदार्थ; 25 स्पेशल शेफ पाहणार व्यवस्था


इंदूरमधील 25 स्वयंपाक्यांची म्हणजेच शेफची विशेष टीम या सोहळ्यातील जेवणाची काळजी घेणार आहेत. पारशी, थाई, मेक्सिकन, जपानी खाद्यपदार्थांचाही मेन्यूमध्ये समावेश असणार आहे. आशियामधील वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमधील बऱ्याच पदार्थांचा समावेश या मेन्यूत असणार आहे. 3 दिवसांमध्ये जवळपास 2500 पदार्थ तयार करुन सर्व्ह केले जाणार आङेत. दुपारचे जेवण, डिनर आणि नाश्ता असं चार वेळेला खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. दरदिवशी ब्रेकफास्टमध्येच 70 प्रकारचे पदार्थ असतील. दुपारच्या जेवणार 250 ते रात्रीच्या जेवणात 250 पदार्थ असतील. 3 दिवसांमध्ये कोणताही पदार्थ रिपीट केला जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पार्टीसाठी विशेष मीड नाईट स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली आहे.