हैदराबाद : आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेताला 'वाईट नजरां'पासून दूर ठेवण्यासाठी एक अजब उपाय शोधून काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नल्लोर जिल्ह्यातील बांदा किंदी पाले या गावातील ४५ वर्षीय ए चेंचू रेड्डी या शेतकऱ्यानं आपल्या शेतात लनी लिओनचं पोस्टर लावलंय... याचा अर्थ असा नाही की तो सनीचा फॅन आहे... त्यानं आपल्या शेतातल्या हिरव्यागार भाज्यांच्या शेतीला कुणाची वाईट नजर लागू नये, यासाठी सनीचं पोस्टर शेतात लावलंय. 


मिळालेल्या माहितीनुसार, चेंचू यांच्या १० एकर शेतीमध्ये शेती होतेय. या शेतीला गावकऱ्यांची किंवा येणाऱ्या-जाणाऱ्यांची वाईट नजर लागू नये यासाठी त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणं, हाच त्यांना एकमेव मार्ग दिसला. यासाठीच त्यांनी लालभडक बिकिनीत असलेल्या सनी लिओनचं एक पोस्टर शेतात लावलंय. या पोस्टरवर तेलुगु भाषेत 'ओरे, नानू चोसी इडावाकुरा' अर्थात 'अहो, माझ्यावर जळू नका' असं म्हटलंय.


दुसरीकडे, शेतकऱ्याच्या या अंधविश्वासावर सुधारतावाद्यांनी जळजळीत टीका केलीय.