मुंबई : जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम केला आहे. कोरोना विषाणूमुळे १६ मार्चपासून शाळा आणि महाविद्यालयांसह देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. सर्व संस्था सुमारे पाच महिने बंद आहेत आणि  या शैक्षणिक संस्था ऑनलाईन अभ्यासावर भर देत आहेत. देशात कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असताना आंध्र प्रदेश सरकारने  (Andhra Pradesh Government) आता महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


१५ ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु होऊ शकतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेश सरकारने १५ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सांगितले, त्यांनी त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत आणि उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना मागितल्या आहेत. या बैठकीनंतर १५ ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी उच्च शिक्षण विभागाच्या (Heigher Education Department ) अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यास सांगितले आहे.


बैठकीतील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय


सीएम रेड्डी यांनी या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये एकूण नोंदणी गुणोत्तर ९० टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर अधिकार्‍यांना लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑनर्स पदवीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ३ वर्षे किंवा ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. १० महिन्यांच्या अ‍ॅप्रेंटिसशिपमध्ये नोंदणी करावी लागेल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी दहा महिन्यांच्या रोजगार आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी एक सेटअप तयार करावा, त्याशिवाय राज्यभरातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.