डोळ्यात दोनच थेंब घेतल्यावर झटक्यात कोरोना...., औषधासाठी अलोट गर्दी, ICMR करणार चाचणी
कोरोनाच्या दुसऱ्या लटाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.
हैद्राबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लटाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी औषधांची कमतरता, तर काही ठिकाणी ऑक्सिजनची. सर्वत्र कोरोनावर मात करण्यासाठी ऑक्सिजन आणि औषधांसाठी लांबचं लांब रांगा लावत आहेत. पण नाल्लोर जिल्ह्यातील कृष्णापट्टणम येथे एका वैद्याने ऑक्सिजनची पातळी वाढवणारं आणि कोरोनामधुन बरं करण्यासाठी औषध तयार केल्याचा दावा केला आहे. त्या वैद्याचं नाव आनंदय्या असं आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही रक्कम मोजावी लागत नाही. शिवाय कोरोनासाठी हे औषध रामबाण असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
कोरोना विळख्यात सापडलेल्या आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्यांसाठी औषध गुणकारी असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय औषध घेण्यासाठी शेजारील राज्यातील लोक देखील गर्दी करत आहेत. या औषधाचे २ थेंब डोळ्यात टाकल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी ८३ वरून ९५ होते, असा दावा केला जात आहे.
हे औषध तीन प्रकारात आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे तीन प्रकार आहेत. अशी माहिती आनंदय्या यांनी दिली शिवाय या औषधांसाठी एक रूपया देखील घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
औषधांची मागणी वाढल्याचं लक्षात येताचं, पोलिसांना औषधांचं वितरण थांबवलं आणि औषधांची योग्य चाचणी झाल्यानंतर औषधांचं वाटप करावं. असं सांगितलं. तसेच याप्रकरणी लोकयुक्तांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. हे औषध घेतल्यानंतर एकाही रूग्णाने तक्रार केलेली नाही.
आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस जगनमोहन रेड्डी म्हणाले की, 'औषधांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी औषधांचे वितरण आणि इतर पुरक बाबींसाठी अभ्यास करून योग्य पावले टाकावीत असे आदेश देण्यात आले आहेत.'
उपराष्ट्रपती व्यंकय्य नायडू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. 'आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव यांच्यासोबत याविषयी चर्चा केली आहे. औषधांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेवू.' असं उपराष्ट्रपती म्हणाले.