student beaten by other students viral: आता एक धक्कादायक घटना (big news) जी पाहून तुमचही हृदय हेलावून जाईल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात एका तरुणाला काही जण बंद खोलीत अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. (sytudent  beaten by others in college viral video) आंध्र प्रदेशातील (andhra pradesh) एका खासगी महाविद्यालयात सहकाऱ्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे.


वसतिगृहाच्या खोलीत एकट्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याबरोबरच काही निर्दयी विद्यार्थ्यांनी त्याच्या शरीरावर लोखंडी रॉडने जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. 


तो रडत होता नका मारू म्हणून विनंती करत होता 


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (viral video of aandhra pradesh college) आपण पाहतोय खोलीच्या  एका कोपऱ्यात त्याला उभं करण्यात आल आहे आणि एक विद्यार्थी त्याच्या समोर उभा राहिलाय त्याला पट्टीने मरतोय.


त्याच्या बाजूलाच बेडवर दोघे जण दिसताहेत त्यातला एक जण मध्येच उठून जोरात त्याच्या हातावर लोखंडी पाईपने मारू लागतो. बिचारा तरुण नका मारू म्हणत गयावया करतोय पण या हैवानांना त्याची जरासुद्धा दया येत नाहीये. 


रिपोर्टनुसार, पीडित तरुण आणि आरोपी विद्यार्थी एसआरकेआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये  (SRKR engineering college aandhra pradesh) कॉम्प्युटर सायन्स फॅकल्टीमध्ये शिकत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे.


मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेजच्या वसतिगृहातील हे असले अमानुष कृत्य समोर येऊ लागले आहेत. पोलीस देखील आता याचा तपास करत आहेत. 



तरुणाच्या पूर्ण शरीरावर जखमा  


या तरुणाला सध्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं आहे पोलीस पुढील तपस करताहेत मात्र त्याच्या संपूर्ण शरीरावर मारल्याच्या खुणा आणि जळाल्याचे डाग सुद्धा आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.