Ankita Bhandari केस प्रकरणात मोठा खुलासा,VIP व्यक्तींसाठी रिसॉर्टमध्ये खास व्यवस्था
अंकिता भंडारी केस प्रकरण;रिसॉर्टमधून पोलिसांच्या हाती लागले अनेक पुरावे
उत्तराखंड : अंकिता भंडारी (Ankita Bhandari) केस प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एसआयटी गठीत झाल्यापासून या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या तपासामुळे आता नवीन धागेदोरे हाती लागत आहेत. यामध्ये व्हिआयपी व्यक्तींसाठी रिसॉर्टमध्ये खास 'प्रेसिडेन्शिअल सूट' (Presidential Suit) बांधण्यात आल्याचा खुलासा झाला आहे.याचं 'प्रेसिडेन्शिअल सूट' मध्ये अनेक अश्लील घटना व्हायच्या अशी सुत्रांची माहिती आहे.
अंकिता भंडारी (Ankita Bhandari) केस प्रकरण संपुर्ण देशात चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून आक्रमक होत नागरीक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे काही दिवसांपुर्वीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी एसआयटी (SIT) स्थापन करत डीआयजी पी. रेणुका देवी यांना प्रभारी केले होते. एसआयटी स्थापन झाल्यापासून तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या हाती अनेक महत्त्वाची माहिती लागली आहे.
घटनास्थळावर सापडला फोन
ज्या धरणातून अंकिताचा (Ankita Bhandari) मृतदेह नुकताच सापडला होता तिथून एसआयटीने एक फोन देखील जप्त केला आहे. हा फोन अंकिताचा असू शकतो असे बोलले जात आहे. या प्रकरणात आता मोबाईल मधला डेटा तपासल्यावर कळणार हा फोन नेमका कोणाचा आहे तो. या प्रकऱणी अधिक तपास सुरु आहे.
रिसॉर्टमध्ये व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रेसिडेंशियल सूट
एसआयटीच्या तपासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.जसे रिसॉर्टमध्ये व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रेसिडेंशियल सूट (Presidential Suit) बांधण्यात आला होता, ज्यामध्ये राहणाऱ्या व्हीआयपींना विशेष ट्रिटमेंट दिली जायची. या प्रेसिडेंशियल सूटमध्ये आणखीण काय-काय व्हायचं याचीही माहिती लवकरच समोर येणार आहे. या घटनेचा तपास स्वत: डीआयजी पी रेणुका देवी यांनी केला आहे. यामध्ये ऱिसॉर्टच्या सीसीटीव्हीमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यासह ऱिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
याप्रकरणी एसआयटीकडे (SIT) अनेक पुरावे मिळाले आहेत. खुनाच्या हेतूपर्यंत पोहोचण्यातही एसआयटीला यश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय हत्येच्या संपूर्ण घटनेचा तपास खूप पुढे पोहोचला आहे.एसआयटीने (SIT) आरोपींना नुकतेच घटनास्थळी नेले होते. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होऊ शकते,अशी माहिती आहे.
प्रकरण काय?
उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर येथील गंगा भोगपूर येथील वनंतरा रिसॉर्टमधील रिसेप्शनिस्ट 19 वर्षीय अंकिताचा (Ankita Bhandari) मृतदेह 24 सप्टेंबर रोजी ऋषिकेशजवळील चिल्ला कालव्यातून सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी रिसॉर्ट ऑपरेटर पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहाय्यक व्यवस्थापक अंकित गुप्ता यांना अटक केली होती.