बंगळुरू : कर्नाटकचे नियोजित मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजपविरोधी पक्षांचे नेते बंगळुरूत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी बंगळुरूत दाखल झाले आहेत. काँग्रेसशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. डीएमकेचे नेते स्टॅलिनही शपथविधीला हजेरी लावणार आहेत. प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय. दरम्यान, भाजपला विरोध करण्यासाठी सर्व विरोधकांकडून शक्तीप्रदर्शन केले जात असल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे.


संभाव्य मंत्री आणि त्यांना मिळणारे खाते, ठळक मद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री पदी  जी. परमेश्वर 
विधानसभा सभापती पदी काँग्रेसचे के. आर. ऱमेश कुमार
जे. डी. एस ला मुख्यमंत्री पद आणि १२ मंत्री पद 
काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद आणि २२ मंत्री पद... 
उद्या संध्याकाळी ४:३० ला  कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार..
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष आणि दलीत नेते जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..


कुमारस्वामींनी घेतले शृंगेरीमठाचे दर्शन


शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी चिकमंगळुरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. एकीकडे जेडीएस-काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असताना भाजप मात्र निषेध आंदोलन करणार आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरुमध्ये काळे झेंडे घेऊन भाजप नेते आणि कार्यकर्ते जेडीएस-काँग्रेसविरोधात आंदोलन करतील.