Anti-Valentine`s Week 2022 ला सुरुवात, कसा साजरा करतात हा आठवडा?
Anti-Valentine`s Week का साजरा करतात? तुम्ही कोणत्या गटात, व्हॅलेंटाईन की अँटी व्हॅलेंटाईन
नवी दिल्ली : व्हेलेंटाईन डेचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळाला. संपूर्ण व्हॅलेंटाइन वीक हा आपल्या पार्टनरसोबत वेगवेगळे दिवस साजरा करण्यात आनंदाचे क्षण गोड आठवणीत गेला आता आजपासून Anti व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होत आहे. हा आठवडा कसा साजरा केला जातो याबद्दल जाणून घेऊया.
जे लोक या व्हॅलेंटाइन वीकमध्ये सिंगल राहिले आहेत, किंवा ज्यांचं ब्रेकअप झालं आहे असे तरुण तरुणी हा आठवडा साजरं करणं पसंत करतात. 15 फेब्रुवारीपासून ते 21 फेब्रुवारीपर्यंत Anti-Valentine's Week 2022 साजरा करण्यात येतो. यामध्ये बरोबर व्हॅलेंटाइन वीकच्या उलट गोष्टी असतात.
15 फेब्रुवारी - Slap Day
ज्यांना प्रेमात धोका मिळाला आहे किंवा ज्याचं मन खूप दुखावलं आहे अशा लोकांसाठी हा दिवस आहे. स्लॅप डे हा केवळ हाताने कानशिलात लगावण्यापेक्षा ज्याने धोका दिला त्याला आपल्या कर्तुत्वाने काहीतरी करून दाखवण्यासाठी हा दिवस साजरा केला जावा. कदाचित तिच एक मोठी चपराक त्यांच्यासाठी असू शकते.
16 फेब्रुवारी - Kick Day
Anti-Valentine वीकमधील दुसरा दिवस हा किक डे म्हणून साजरा केला जातो. या दिवस चुकीच्या गोष्टींना लांब सोडून पुन्हा एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे असाही एक समज आहे. दु:ख देणाऱ्या भावनांना काढून टाकणं या दिवशी फायदेशीर ठरू शकतं.
17 फेब्रुवारी - Perfume Day
परफ्यूम डेच्या दिवशी तुम्ही स्वत:ला खूप प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. या दिवशी काही जण नवीन परफ्यूम देखील खरेदी करतात. नवा संकल्प करतात आणि हा दिवस साजरा करतात.
18 फेब्रुवारी - Flirting Day
हा दिवस Flirting Day म्हणून साजरा केला जातो. यामुळे नव्या लोकांना भेटण्याचा आनंदही काहीवेळा आपल्याला मिळू शकतो.
19 फेब्रुवारी - Confession Day
संपूर्ण व्हॅलेंटाइन वीकमध्ये किंवा त्या व्यतिरीक्तही आपलं काही चुकलं असेल किंवा काही बोलायचं राहून गेलं असेल तर ते सांगण्याचा हा दिवस आहे. ज्या दिवशी तुम्ही खरं कबुल करून पुन्हा एक नवीन सुरुवात करायला हवी. त्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
20 फेब्रुवारी - Missing Day
तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला ही कबुली द्या की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. त्या व्यक्तीला तुम्ही किती मीस करता त्याला हे सांगण्याच्या दिवस. काही जुन्या आणि चांगल्या आठवणीत रममाण होण्याचा हा दिवस आहे.
21 फेब्रुवारी - Breakup Day
तुम्ही जर तुमच्या नात्यामध्ये थकला असला आणि तुम्ही एकाच बाजूने सतत प्रयत्न करूनही सुधारणा होत नसेल तर ते नातं थांबवण्याचा हा दिवस आहे. ते नातं कायमस्वरुपी थांबवायला हवं त्यासाठी