Brahmin Genes : सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी विविध मुद्द्यांवर विविध विषयांवर सातत्यानं व्यक्त होत असतात. याच नेटकऱ्यांनी आजपर्यंत या माध्यमातून कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रियाही दिल्याचं पाहायला मिळालं आहे. व्हायरल प्रकरण किंवा मग ट्रेंडिंगविषयाला वाव देणारं मूळ ठिकाण म्हणजे ही सोशल मीडिया. याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी एका महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. कानामागे एक फुल, मोकळे केस आणि दंडावरचे दर्शनीय स्नायू... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोसाठी तिनं कॅप्शन देत लिहिलं, Brahmin Genes. बस्स... तिनं हा फोटो शेअर केल आणि त्यावर लिहिलेल्या कॅप्शननं नव्या वादानं डोकं वर काढलं. या एका फोटोमुळं जातीयवादावरून मतमतांतरं झाली आणि ही महिला, म्हणजेच अनुराधा तिवारी अनेकांच्याच निशाण्यावर आली. काहींनी तिच्या या पोस्टला कडाडून विरोध केला तर, काहींनी तिची पाठराखणही केली.


अनुराधा तिवारी ही कंटेंट मार्केटिंग कंपनी  JustBurstOut ची संस्थापिका आणि सीईओ असून, या पोस्टमुळं 2022 मधील तिच्या एका जुन्या पोस्टनंही सर्वांचं लक्ष वेधलं. जिथं तिनं आपल्या सामाजिक स्तरावर भाष्य करत, आपण भाड्याच्या घराच राहतो इथपासून 95 टक्के मार्क मिळवूनही मला शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही, तिथं माझ्याच बरोबरीनं शिकणाऱ्यांना 60 टक्के गुण असतानाही प्रवेश मिळाला आणि तुम्ही विचारताय आरक्षणाची मला काय अडचण?, या शब्दांत मनातील खदखद बोलून दाखवली होती. 


हेसुद्धा वाचा : गावाकडे जाऊन लग्न करणाऱ्या महिलांना सरकारी तिजोरीतून मिळणार आहेर; अट फक्त एकच 


अनुराधानं तिच्या ब्राह्मण असण्यावर आणि समाजातून तिला नेहमी कशी वागणू मिळाली यावरही भाष्य केलं. एकिकडून तिला एका फोटोवरील कॅप्शनमुळं अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे तिनं स्वत:चीच ओळख सांगत काही मुद्दे अधोरेखित केले. 


'अनुराधा कोण आहे ? 
ती समाजातील एका सर्वसामान्य वर्गातून येणारी अभिमानी ब्राह्मण महिला आहे. जिच्या समाजाचं भारतात कायम शोषण झालं.


आरक्षण- नाही
मोफतच्या सुविधा- नाही 
सरकारी मदत- नाही
ओळख- जातिभेद करणारे, गोमूत्र पिणारे 
जातीचा फायदा- रोजचे हेवेदावे, शिवीगाळ आणि घृणा


हे मी माझ्या एकटीबद्दल बोलत नाहीये... भारतातील प्रत्येक सर्वसामान्य ब्राह्मणाविषयीचं हेच कटू सत्य'



सोशल मीडिया आणि माध्यमांनी अनुराधाविषयी दिलेल्या माहितीवर तिनं तीव्र नाराजी व्रक्त करत आपली ओळख स्पष्टच सांगितली. इथंही तिच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळालं आणि  पुन्हा देशातील विविध जाती, धर्म आणि पंथातील मंडळींनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली.