पठानकोट एअरबेसवर उतरले जगातील सर्वात घातक अपाचे हेलिकॉप्टर
दहशतवादी आणि पाकिस्तानला धडकी भरवणारं हेलिकॉप्टर
नवी दिल्ली | जगातील सर्वात खतरनाक लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आलं आहे. यामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार असून शत्रूंना नक्कीच घाम फुटणार आहे. अपाचे AH-64E अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. जगातील सर्वात घातक असं हे हेलिकॉप्टर मानलं जातं.
भारतीय वायुदलाने अपाचे हेलिकॉप्टसाठी अमेरिकी आणि बोईंग लिमिटेड सोबक सप्टेंबर 2015 मध्ये करार केला होता. त्यानंतर बोईंगने 27 जुलैला 22 पैकी 4 हेलिकॉप्टर दिले होते. त्यानंतर आज 8 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. अपाचे हे जगातील सर्वात घातक असं हेलिकॉप्टर असल्याने पारंपरिक युद्धामध्ये त्याचा फायदा होईल. लपून बसलेल्या दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
By embedding Twitter content in your website or app, you are agreeing to the Developer Agreement and Developer Policy. Preview
अत्याधुनिक हत्यारं असलेलं आणि जलद उड्डाण करणारं हे हेलिकॉप्टर जमिनीवर होणाऱ्या सगळ्या हल्ल्यांना उत्तर देऊ शकतो. मिलीमीटर वेव रडारमुळे शत्रू कोठे लपून बसले आहे. याची माहिती मिळेल. लेजर गाइडेड हेलफायर मिसाईल, हायड्रा-70 अँटी ऑर्मर रॉकेट आणि 30 मिमी गन हे हेलिकॉप्टर उद्धवस्त करु शकतो. हे हेलिकॉप्टर थर्मल इमेजिंग सेंसरचा वापर करुन लपलेल्या दहशतवाद्यांना देखील शोधू शकतो. तसेच 30 एमएमच्या गनने ठार देखील करु शकतो.
अपाचे हेलिकॉप्टरने आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अमेरिकेने इराकच्या लष्करासोबत आणि अफगाणिस्तानमध्ये डोंगराळ भागात लपलेल्या तालिबानच्या दहशतवद्यांसोबत याच अपाचे हेलिकॉप्टरचा वापर केला होता. बोईंगने जगभरात जवळपास 2200 अपाचे हेलिकॉप्टर दिले आहेत. 2020 पर्यंत भारतीय वायुसेनेकडे 22 अपाचे हेलिकॉप्टर असतील.
अपाचे हेलिकॉप्टर कोणत्याही लष्करी कारवाईसाठी वापरता येणार आहे. रात्री देखील हे हेलिकॉप्टर उड्डाण भरु शकतो. उच्च क्षमतेचं हे हेलिकॉप्टर दोन टर्बोशेफ्ट इंजिनपासून बनलेले आहे. अपाचे 293 किमी प्रति तासाच्या वेगाने उडू शकतो. अपाचे AH-64E मध्ये 30 एमएमची M230 ऑटोमॅटिक गन आहे. ज्यामधून 1200 राउंड फायरिंग केली जाऊ शकते.