iPhone 16: अ‍ॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अ‍ॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरियामध्ये झालेल्या बैठकीत अ‍ॅपल आणि संबंधित कंपन्यांनी गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) च्या सेक्टर 29 मधील 5 एकर जमिनीवर उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली. कंपनी 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हजारो लोकांना रोजगार देणार आहे. आयफोन 15 पुढच्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आयफोन 16 भारतात तयार करण्यासाठी एक वर्षांचा अवधी असेल. म्हणजेच पुढच्या वर्षांत प्लांट लागणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

YEIDA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण वीर सिंग यांनी सांगितलं की, अ‍ॅपल आणि संबंधित कंपन्यांना सेक्टर 29 मध्ये जमीन उपलब्ध करून दिली जाईल. ही जागा अनेक उपलब्ध सुविधांनी विकसित आहे. कंपन्या बांधकामानंतर उत्पादन सुरू करू शकतील आणि 10 टक्के रक्कम जमा केली आहे.



बातमी वाचा: YouTube द्वारे कमाई करण्याची नामी संधी, जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत


अ‍ॅपल 2023 मध्ये आपली iPhone 15 सीरिज लाँच करणार आहे. आयफोन 14 सीरिजप्रमाणे या सीरिजमध्येही किमान 4 मॉडेल्स सादर केले जाण्याची शक्यता आहे. नॉन-प्रो मॉडेलमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टपासून डायनॅमिक आयलंडपर्यंत, आयफोन 15 मालिकेत प्रथमच अनेक नवीन फीचर्स सादर केली जाण्याची शक्यता आहे. iPhone 15 सीरीज लाँच होण्यास अजूनतरी 9 महिन्यांचा अवधी आहे. तरीही आगामी iPhones बद्दल बरीच माहिती लीक होत आहे.