Archaeological Survey : मानवाची उत्क्रांती, त्याचा विकास आणि त्यानंतर आधुनिक युगाच्या दिशेनं मानवाची वाटचाल या सर्व गोष्टी शतकानुशतकं घडत गेल्या. या प्रक्रियेसाठी मोठा काळ लोटला. दरम्यानच्या काळात अनेक बदल झाले, भौगोलिक रचना बदलल्या, नैसर्गित आपत्ती आल्या, काही संस्कृतींचा ऱ्हास होऊन काहींचा नव्यानं उदय झाला. पण, ही सगळी रहस्य आजही अस्तित्वात असल्यामुळं गतकाळाची झलक तुम्हाआम्हाला अगदी 21 व्या शतकातही सहजपणे पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रातही असा ठेवा आहे. जो पाहताना आपण भारावून जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच पद्धतीचे काही अवशेष पुरातत्वं खात्याला देशाच्या आणखी एका भागात सापडले. हा भाग म्हणजे मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान. सहसा वाघांच्या अधिवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागामध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना अत्यंत दुर्मिळ असा ठेवा सापडला. इथं साधारण 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची चित्र, मानवनिर्मित जलसस्त्रोत, जलाशयं आणि इतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि पुरातत्वं विभागही अचंबित राहिला. आधुनिक संस्कृती अस्तित्वात होती आणि तीसुद्धा या अनोख्या रुपात हेच या उत्खननातून समोर आलं. (Bandhavgarh National Park In Madhya pradesh)


हे राष्ट्रीय उद्यान काही हजार वर्षांपूर्वी कशासाठी वापरलं जात होतं? 


बांधवगड क्षेत्रातील हे सर्व अवशेष पाहता हा भाग कधी एकेकाळी पुरातन व्यवसाय केंद्रांच्या दिशेनं जाणाऱ्या वाटेतच येत असावा असा तर्क लावला जात आहे. इथूनच व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा व्हायची आणि याच भागातील दगडी गुहांमध्ये काहीशी विश्रांती घ्यायचे हेसुद्धा या संशोधनातून समोर येत आहे. 


बांधवगडमध्ये सापडलेले मानवनिर्मित जलस्त्रोत 1800 ते 2000 वर्षे पुरातन आहेत. त्यापैकी काहींची डागडुजी साधारण 1 हजार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. इथं असणारी चित्र किमान 1500 वर्षे जुनी आहेत. ASI  अर्थात भारतीय पुरातत्वं विभागाच्या माहितीनुसार इथं असणारे जलस्त्रोत हे एका ठराविक उंचीवर असून यातून पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यातं तंत्र केंद्रस्थानी ठेवून ते साकारले गेले आहेत. याचा अर्थ इथं प्रगत शहराचं अस्तित्वं होतं. 


हेसुद्धा वाचा : डेस्टिनेशन नव्हे, आता करा Space Wedding; लग्नानंतर खरंच म्हणाल 'चंद्र आहे साक्षीला'



रहस्यमयी क्षेत्र... 


मध्य प्रदेशातील बांधवगड आणि आजुबाजूचा परिसर हा रहस्यमयी भाग असून, इथं आतापर्यंत उत्खननातून गतकाळातील बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मागील वर्षी ASI ला इथं दुसऱ्या ते पाचव्या शतकातील साधारण 26 बौद्ध लेणी सापडल्या होत्या. या भागात पुरातत्वशास्त्रज्ञांना व्यापाऱ्यांच्या निवाऱ्याच्या गुहासुद्धा सापडल्या होत्या. ज्यामुळं गतकाळातील ही अवशेष पाहताना आपण नेमके किती पुढे आलो आहोत हे अगदी सहजपणे लक्षात येतंय.... नाही का?