Mobile Use : मोबाईलचा अतिवापर तुमच्या आरोग्यास घातक ठरू शकतो, असा दावा करण्यात येतोय. तुमच्या चेह-यावर वारंवार चट्टे येत असतील तर यामागे मोबाईलचा अतिवापर हे कारण असू शकतं, असा दावा करण्यात आलाय. अनेक जण रात्री मोबाईलचा वापर करतात. मोबाईलच्या वापरामुळे चेह-याच्या त्वचेवर गंभीर परिणाम होतो.


काय आहे व्हायरल मेसेज? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनिर्व्हसिटी ऑफ आयोवाच्या प्रा.थान यांच्या म्हणण्यानुसार अॅलर्जी आणि दम्यासारख्या आजाराने त्रस्त असणा-या व्यक्तींनी वेळीच सावध होऊन मोबाईल वारंवार निर्जंतुक करावा.कारण, मोबाईलमुळे अॅलर्जी होऊ शकते.



या संशोधनासाठी 15 वेगवेगळे मोबाईल 15 स्वयंसेवकांना देण्यात आले होते. त्यांनी सलग 15 दिवस मोबाईलचा वापर केल्यानंतर ते स्वच्छ करण्यात आले. यावेळी मिळालेले नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये बीटा-डी ग्लुकेन्स हा जीवाणू सापडला तो श्वसन मार्गावर परिणाम करतो. 


पडताळणीतून काय समोर आलं? 


  • मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहेत

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे अॅलर्जी होत नाही

  • मोबाईलच्या अतिवापराचा चेह-यावर परिणाम होतो

  • चेह-यावर काळे डाग येतात, सुरकुत्या पडतात

  • चेह-यावरील टवटवीतपणा निघून जातो


त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा. अतिवापर आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.