Areez Pirojshaw Khambatta passes away : प्रसिद्ध रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष पिरोजशा खंबाटा यांचे निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी खंबाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. खंबाटा यांच्या निधनाबाबत रसना ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. (Areez Pirojshaw Khambatta passes away Latest Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यापार आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यांतही निवेदनामध्ये म्हटलं आहे.  खंबाटा यांनी 1970 च्या दशकात महागड्या शीतपेय उत्पादनांना पर्याय म्हणून रसनाचे परवडणारे शीतपेय पॅक बनवले होते. ज्याला अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळाली. 


रसना आता जगातील सर्वात मोठी ड्राय/लिक्विड सॉफ्ट ड्रिंक उत्पादक आहे. 'रसना' हे फळांपासून बनवलेले कोरडे शीतपेय केवळ 1 रूपयामध्ये ग्राहकांना उपल्ब्ध आहे. लाखो भारतीयांची रसना हेस तहान भागवत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. रसना ब्रँड सध्या जगभरातील 60 देशांमध्ये विकला जातो आणि बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्स (MNCs) चे वर्चस्व असलेल्या शीतपेय विभागात नेहमीच आघाडीवर आहे.