नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्यसंस्कारावेळी त्यांनी तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी सिंग यांच्या सन्मानार्थ राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. 



केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बरार स्क्वेअर येथे जाऊन अर्जन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.


मार्शल अर्जन सिंग हे ‘फाइव्ह स्टार रँक’ मिळवणारे हवाई दलातील एकमेव अधिकारी होते. आज त्यांचे पार्थिव दिल्लीच्या बरार सेक्वेअरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सिंग यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.