लद्दाखवर बोलले लष्करप्रमुख `LAC वरील परिस्थिती तणावपूर्ण`
या दरम्यान लष्करप्रमुख एमएम नरवणे गुरूवारपासून लद्दाखच्या २ दिवसीय दौऱ्यावर
लद्दाख : भारत-चीन सीमेवर तणाव (India-China Border Dispute) वाढला आहे, या दरम्यान लष्करप्रमुख एमएम नरवणे हे गुरूवारपासून लद्दाखच्या २ दिवसीय दौऱ्यावर आहेत. लष्करप्रमुख या दौऱ्यात भारत आणि चीन सीमेवर लष्कराच्या तयारीची समिक्षा करण्यासाठी पोहोचले आहेत. लष्करप्रमुखांनी चुशूलमधील चौक्यांचा दौरा देखील केला आहे.
LACवरील परिस्थिती तणावपूर्ण
लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी म्हटलं आहे की, LACवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. येथील स्थिती अतिशय नाजूक आहे, सुरक्षेसाठी आम्ही पावलं उचलली आहेत, भारतीय सैनिकांमध्ये मात्र मोठा उत्साह आहे.
चर्चेने परिस्थिती निवळू शकते
एमएम नरवणे यांनी असं देखील म्हटलं आहे, आम्ही LACवर यथास्थितीत परिस्थिती ठेवणार आहोत. लष्करी आणि कुटनीतीक दोन्ही पद्धतीने चीनशी चर्चा सुरू आहे. या अडचणीवर चर्चेने जरुर मार्ग निघू शकतो.
चीनकडून सीमेवरील अतिक्रमणाचा प्रयत्न फसला
लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारतीय लष्कराने मागील आठवड्यात चीनला अनेक वेळा मात दिली आहे. पँगांगमध्ये चीनच्या अतिक्रमणाचा प्रयत्न परतावून लावण्यात आला. ब्लॅकटॉपवर भारतीय लष्कर पाय रोवून उभं आहे. याशिवाय १९६२ मध्ये रेकिन ला आणि रेजिंग ला या भागावर चीनने कब्जा केला होता, यावर भारताने पुन्हा नियंत्रण मिळवलं आहे.
युद्ध लढण्याआधी चीन पराभवाकडे
लद्दाखच्या पँगोंग झीलजवळ पहिल्यांदाच चीन युद्ध लढण्याआधी पराभवाकडे जात आहे, कारण पँगाँग झीलचा दक्षिणेकडचा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. यात अनेक आजूबाजूचे पहाडही भारताच्या नियंत्रणात असल्याने चीनला कोणतीही हालचाल येथे करता येत नाहीय.